MahaDBT Yojana: विहीर अनुदान योजना मागेल त्याला विहीर, 4 लाखांपर्यंत अनुदान.

विहीर अनुदान योजना 2023: महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य आहे त्यामुळे नवीन विहीर खोदण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी ववकारात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध झालेल्या पाण्याचा किफायतशीर वापर केल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना वर आणण्यात मदत होईल.

विहीर अनुदान योजना

विहीर अनुदान योजना शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.

सुधारित शासन निर्णयानुसार विहीर अनुदान योजनेचा लाभ खालील प्रवर्गातील शेतकरी घेऊ शकतात.

  1. अनुसूचित जाती.
  2. अनुसूचित जमाती.
  3. भटक्या जमाती.
  4. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती).
  5. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी.
  6. खस्त्री-कर्ता असलेली कुटुंबे.
  7. शारीरिकहृष्ट्या विकलांग व्यकती कर्ता असलेली कुटूंबे.
  8. जमीन सुधारणांचे लाभार्थी.
  9. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी.
  10. अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २ खालील लाभार्थी.
  11. सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा).
  12. अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणी).

विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लाभार्थ्याने आपण खालील अटींची पूर्तता करतो का ते पाहावे कारण खाली दिलेले निकष हे शासनाकडून औपचारिकरीत्या दिलेले आहेत.

  • लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्‍टर क्षेत्र सलग असावे.
  • दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
  • i. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run Off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
  • ii. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
  • लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
  • एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्‍टर पेक्षा जास्त असावे.
  • ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

4 thoughts on “MahaDBT Yojana: विहीर अनुदान योजना मागेल त्याला विहीर, 4 लाखांपर्यंत अनुदान.”

  1. मला माझ्या शेतात नवीन विहीर काढायची आहे अनुदान मिळण्यासाठी काय करावे लागते

    Reply

Leave a Comment