Namo Shetkari Yojana: या तारखेला पहिल्या हप्त्याचे २००० रुपये खात्यात होणार जमा

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हि केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री कृषी सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जात आहे. नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मानधन देण्याचे महाराष्ट्र शासनाचे नियोजन आहे.

Namo Shetkari Yojana

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला किंवा नमो शेतकरी योजनेस फक्त तेच शेतकरी पात्र असतील ज्यांना प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आधीपासूनच PM Kisan योजनेचे वार्षिक ६००० रुपये मानधन मिळत असेल तेच शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांना सध्या तरी कोणत्याही प्रकारची नोंदणी किंवा कागदपत्रे जमा करायची नाहीत कारण महाराष्ट्र शासन PM किसान लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा डेटा केंद्र सरकार कडून घेणार आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजनेची सुरुवात झालेली आहे, परंतु अद्याप तरी एप्रिल-जुलै चा पहिला हप्ता जमा झालेला नाही. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जवळ जवळ १७२० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
आणि य्याच निधीच्या माध्यमातून आता महाराष्ट्र राज्यातील ९५ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच वितरण केलं जाणार आहे.

Namo Shetkari Yojana किती तारखेला हप्ता जमा होणार आहे?

मागच्या बऱ्याच महिन्यांपासून या योजनेची चर्चा होती आणि पहिला हप्ता एप्रिल-जुलै साठी असेल हे पण ठरले होते, परंतु हप्ता जमा होण्याची तारीख न समजल्यामुळे हप्ता कधी जमा होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण आता बऱ्यापैकी तारीख निश्चितच झाल्यात जमा आहे.

२६ ऑक्टोबर, २०२३ रोजी शिर्डी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि याच दिवशी कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ९५ लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची रक्कम वितरित केली जाण्याची शक्यता आहे.

1 thought on “Namo Shetkari Yojana: या तारखेला पहिल्या हप्त्याचे २००० रुपये खात्यात होणार जमा”

Leave a Comment