Mahadbt Lottery: महाडीबीटी लॉटरी पद्धत होणार बंद

मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी बनवलेल्या Mahadbt Farmer पोर्टल अर्थातच एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक या पोर्टल च्या माध्यमातून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राबवली जाणारी लॉटरी पद्धत लवकरात लवकर बंद करावी असे निर्देश कृषी मंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाला व कृषी विभागाला दिलेले आहेत.

Mahadbt lottery

कृषी विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात नुकतीच एक संयुक्त बैठक पार पडली त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या बैठकीद्वारे कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मागच्या काही वर्षांपासून राज्य शासनाच्या सर्वच योजना MahaDBT Farmer या ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, मग त्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करणे असेल, ऑनलाईन अर्ज करणे असेल, किंवा लाभ मिळवणे असेल.

महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध प्रकारच्या पंचवीसहून अधिक योजना या महाडीबीटी फार्मर पोर्टल च्या द्वारे राबवल्या जातात. महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती आत्तापर्यंत राज्यातील तीस लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची, सिंचन पद्धतीची आणि पिकाची माहिती महाडिबीत पोर्टल द्वारे सरकार पर्यंत पोहचलेली आहे.

आजतागायत एक कोटींहून अधिक अर्ज हे महाडिबी पोर्टल वरती दाखल करण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अर्जातून तरतूद केल्याला निधीपर्यंत जेवढे अर्ज लागतील तेचढेच अर्ज निवडले जातात. अर्ज निवडीच्या या प्रक्रियेमध्ये Mahadbt Lottery पद्धतीचा वापर करून आवश्यक तेवढ्या अर्जाची निवड केली जाते.

लॉटरी पद्धतीमुळे अर्ज प्रक्रीमध्ये पारदर्शकता राहते, बऱ्याच शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळतो तर काही जन वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. पात्र असूनही लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी निराश होतात आणि बऱ्याच वेळेस लॉटरी पद्धतीवर प्रश्नही निर्माण केलेलं आहेत.

हि असेल नवीन पद्धत

जास्तीत जास्त शेतकर्याना लाभ मिळावा यासाठी मागेल त्याला योजना हा पण एक उत्तम विकल्प ठरू शकतो परंतु तरतूद केलेल्या निधीच्या प्रमाणातच लाभ मिळवून देणे शक्य असल्यामुळे मागील त्याला योजना सर्व योजनांसाठी राबवणे शक्य नसणार.
कृषी विभागाने सुचवल्याप्रमाणे जे शेतकरी प्राधान्याने अर्ज करतील अशा प्रथम प्राधान्याने आलेल्या अर्जांना निधीच्या तरतुदीनुसार जेवढे अर्ज लागतील त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जे शेतकरी पहिल्यांदा अर्ज करतील असे आवश्यक आणि पात्र अर्ज निवडले जातील. म्हणजे जर समजा एखाद्या योजनेसाठी 10,000 अर्ज आले आणि जर निधीची तरतूद 1,000 अर्जाची पूर्तता होईल एवढीच असेल तर,
आलेल्या 10,000 अर्जातून असे 1,000 अर्ज निवडले जातील ज्यांनी वेळेनुसार प्रथम अर्ज भरलेले आहेत.

Leave a Comment