पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा भार कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध कर्जमुक्ती योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्या अनुषंगानेच राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६‘ जाहीर केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, या योजनेसाठी शासनाने जवळपास ₹३६,५८५ कोटींची तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत थेट कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी आता आपल्या नावाचा लाभार्थी यादीमध्ये समावेश झाला आहे का, हे तपासत आहेत. जे कि तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून पाहता येईल.
शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
✅ ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी
योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे कि सर्व पात्र शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करणे, यासाठी हा निकष आहे:
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे या योजनेस पात्र राहतील.
✅ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ₹५०,००० प्रोत्साहन अनुदान
बरेच शेतकरी ने नियमितपणे कर्जाची परतफेड करत असतात त्यांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी पुढीलप्रमाणे लाभ दिला जाणार आहे:
सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५०,००० पर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
✅ ₹२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी OTS योजना
OTS – वन टाईम सेटलमेंट म्हणजेच एक वेळ समझौता योजनेद्वारे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पुढील पद्धतीने लाभ मिळवून दिला जाणार आहे:
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ₹२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी सरकारने One Time Settlement (OTS) योजना लागू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी ₹२ लाखांपेक्षा जास्त असलेली रक्कम स्वतः भरल्यानंतर उर्वरित ₹२ लाखांचे कर्ज सरकारकडून माफ केले जाणार आहे.
तुमचे कर्ज माफ होणार की नाही? एका मिनिटात तपासा
सर्व शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार की नाही, आणि हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासणे.
जर तुमचे नाव यादीमध्ये असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जिल्ह्याची कर्जमाफी यादी एकदा नक्की तपासावी.
कर्जमाफी यादी PDF डाउनलोड करा – Download Karj Maafi PDF List
खाली दिलेल्या लिंक द्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या, नाव तपासण्याची प्रक्रिया आणि जिल्हानिहाय लाभार्थी यादी PDF डाउनलोड लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, आताच तुमच्या जिल्ह्यानुसार यादीमध्ये तुमचे नाव तपासा:
