कर्जमाफी योजना 2026 लाभार्थी यादी – तुमचे नाव कसे तपासाल?

कर्जमाफी योजना 2026 लाभार्थी यादी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हानिहाय याद्या प्रकाशित करायला सुरु आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीमध्ये असेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.

यादीमध्ये नाव तपासा

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार यादी च्या लिंक वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमच्या तालुका निवडल्यावर तुमच्या समोर गावांची यादी प्रकाशित होईल. या पर्यायांमधून तुमचे गाव निवडा आणि शेवटी डाउनलोड PDF लिस्ट या पर्यायावर क्लिक करा.

PDF डाउनलोड केल्यावर सर्च बॉक्स मध्ये तुमचे नाव टाकून सर्च करा आणि तुमचे नाव आहे का नाही ते पाहा.

लाभार्थी यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे नाव आहे?

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याच्या आधी त्यांची यादी बनवलेली आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत असेल तर बँकेमध्ये जाऊन त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करतील, त्यामुळे यादीत यांचे नाव असेल:

  • कर्ज घेतलेले पात्र शेतकरी
  • शासनाच्या अटी पूर्ण करणारे शेतकरी
  • संबंधित बँकांकडून पडताळणी पूर्ण झालेले लाभार्थी
  • शासनाने मंजूर केलेल्या यादीतील शेतकरी

यादी कुठे पाहायला मिळेल?

शासनाने योजनेची सर्व माहित व लाभार्थी याद्या डिजिटल स्वरूपात म्हणजेच मोबाईल वर अपलोड करायला सुरु केले आहे. त्यामुळे तुम्हाला लाभार्थीं याद्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालय तसेच बँकेच्या नोटीस बोर्डवर देखील यादी पहायला मिळेल.

Leave a Comment