मित्रांनो सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर लोक कुणबी रेकॉर्ड शोधत आहेत. कुणाकडे कुणबी नोंदी असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा नवा नियम सरकारने केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लढा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा लेख आज कुणबी जातीबद्दल, कुणबी नोंदी कशा शोधायच्या आणि कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल सांगेल. म्हणून, तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, संपूर्ण लेख जरूर वाचा.
कुणबी जात म्हणजे काय?
कुणबी या शब्दाचा अर्थ “शेतकरी वर्ग” किंवा “शेतकरी जात” असा होतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी समाजाला कुणबी म्हणतात. कुणबी हा शब्द दोन शब्दांपासून आला आहे: “कुण” म्हणजे लोक आणि “बी” म्हणजे बीज. याचा अर्थ कुणबी लोक ते आहेत जे एकापेक्षा जास्त बियाणे तयार करणारे म्हणजेच शेतकरी आहेत.
कुणबी लोक संपूर्ण देशात आहेत त्यामुळे उत्तर भारतात जे कुणबी आहेत त्यांना कुरमी असेही ओळखले जाते. कुरमी या शब्दाचा उगम होतो संस्कृत मधील कुरु किंवा कुर या शब्दापासून ज्याचा अर्थ होतो कर्म करणे किंवा शेतीची कामे करणे. अशाप्रकारे देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाणारे कुणबी मुख्यतः शेती करायचे आणि ते क्षत्रिय पण होते, म्हणजे ते युद्ध पण लढायचे.
मराठा व कुणबी एकच आहेत का?
कुणबी आणि मराठा यांच्यात पूर्वीपासूनच कोणताही भेदभाव नसायचा सोप्या शब्दात बोलायचे झाले तर जे कुणबी लोक युद्धाच्या वेळी शस्त्र उचलायचे ते मराठा म्हणजे कुणबी लोक ते होते ज्यांच्या हातात दोन्ही शस्त्र आणि अन्न होते.त्यामुळे जे लोक पूर्वीपासूनच शेती व्यवसाय करत आले होते ते कुणबी आणि ज्यांनी युद्धकाळात शस्त्रे उचलली ते कुणबी मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यामुळे सर्व मराठे तत्वतः मराठा कुणबी च आहेत हे मान्य केले जावू शकते.
सुरुवातीला कुणबी लोक पश्चिम-दक्षिण भारतातील महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यात राहत होते. पण जसजसे मराठा साम्राज्य वाढत गेले तसतसे ते भारतभर पसरले आणि त्यांनाही मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले.
कुणबी नोंद कशी शोधावी? Download Kunbi Proof
कुणबी आरक्षणाबद्दल निर्णय झाल्यानंतर सरकारने, ज्याच्याकडे कुणबी नोंदी असले अशा कुटुंबातील सर्वांना त्याचा लाभ मिळेल असे स्पष्ट केले होते. म्हणजे जर आपल्या कुटुंबातील कुणाचीही कुणबी नोंद सापडली तर रक्ताच्या नात्याने जोडणाऱ्या सर्वांना त्याचा फायदा होईल.
मग आता कुणबी नोंद कशी सापडायची कुठे शोधयायाची हा सर्वात मोठा प्रश्न होता. ज्यांच्या आजोबा पंजोबा यांच्या काळातील दाखल्यांवरून नोंदी सापडतील त्यांना काही अडचण नाही पण ज्यांना सापडत नाही त्यांच्यासाठी मग सरकारही लोकांना कुणबी रेकॉर्ड शोधण्यात मदत करत आहे! त्यांनी या सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर, जिल्ह्याद्वारे आयोजित केल्या आहेत, आणि तुम्ही ते पीडीएफ फाइलमध्ये डाउनलोड करून पाहू शकता.
खाली जिल्ह्यानुसार कुणबी नोंदी डाउनलोड करण्यासाठी बनवलेल्या वेबसाइट ची लिंक दिली आहे, कृपया तुमच्या जिल्ह्याचा नावावर टच करा.
वरील लिंक वरती क्लिक केल्यावर कुणबी नोंद पुरावा PDF कसे डाउनलोड करायाचे ते समजेल.