Download Kunbi Nond PDF | कुणबी नोंद पुरावा डाउनलोड करा

मित्रांनो, तुम्हाला जर तुमची कुणबी नोंद शोधायची असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय थोडा कठीण आणि वेळ घालवणारा आहे. आणि दुसरा पर्याय अगदी सोपा आणि सरळ आहे आणि या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दुसरा आणि अगदी सोप्पा पर्याय वापरून तुमची कुणबी मराठा नोंद कशी पाहायची आणि डाउनलोड करायची ते पाहणार आहोत.

तर पहिला म्हणजे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेले तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर परिषद कार्यालय अशा विविध कार्यालयात जाऊन तिथे तुमच्या नोंदी पाहू शकता तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात जन्म मृत्यू नोंदी, जुने गांवठाण मधील अभिलेखात तुम्हाला जातीची नोंद मिळू शकते.
अशाप्रकारे जर नोंदी शोधायचे म्हणाले तर तुमचा खूप वेळ या प्रक्रिये मध्ये जाईल आणि नंतर दाखला मिळेपर्यंत जो वेळ जाईल तो वेगळाच. म्हणू आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुमची नोंद कशी पाहायची ते सांगणार आहोत.

तुमची कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया जलद व्हावी म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा कुणबी नोंदी शोधण्याच काम हाती घेतल आहे. यासाठी शासनाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना व तहसील कार्यालये तसेच इतर शासकीय संस्थांना आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार कलेक्टर ऑफिस च्या वेबसाईट वर या सर्व नोंदी जिल्ह्या नुसार व त्यातील तालुक्यानुसार आणि गावानुसार PDF स्वरूपात लावलेल्या आहेत, त्या तुम्ही Download करून पाहू शकता.

तुमची कुणबी नोंद येथून करा Download

खाली जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कुणबी नोंदीणीसाठी बनवलेल्या वेबसाईट च्या लिंक दिल्या आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार लिंक वरती क्लिक करायचे आहे.
नोंद कशी donwload करायची याविषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या खाली दिलेली आहे, ती जरूर वाचावी जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment