माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस: महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास २ कोटी ५० लाख हून अधिक अर्जदारांनी अर्ज भरलेले आहेत. ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले त्यांना या योनजेचे मागील सर्व हप्ते मिळाले असतीलच, जर ते हप्ते मिळाले नसतील किंवा डिसेंबर चा १,५०० रुपयांचा हप्ता मिळाला नसेल तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे आणि कोणत्या स्टेटस साठी कोणती कार्यवाही करायची हे जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस काय आहे?
लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस: पेमेंट स्टेटस चेक करणे म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळण्याचे कारण तपासणे किंवा हा हप्ता कधी मिळणार हे जाणून घेणे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून दर महिन्याला १,५०० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. १,५०० रुपयांचा हा हप्ता महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जमा होतो त्यामुळे त्याला ट्रॅक केले जाते आणि त्याची नोंद ठेवली जाते जेणेकरून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडली जावी.
काही महिलांना लाभ मिळण्यात काही अडचणी येतात आणि त्यांना काय अडचण आली आहे मग ती कागदपत्रांमुळे असेल किंवा आधार सीडींग मुळे असेल, हे जाणून घेण्यासाठी पेमेंट स्टेटस चेक करण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
पेमेंट स्टेटस चेक करण्याची पद्धत
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने रजिस्टर केलेले हे माहिती असायला हवे:
- नारी शक्तीदूत अॅप द्वारे,
- वेबसाईट द्वारे,
- अंगणवाडी सेविकांद्वारे,
- इतर व्यक्तीकडून.
आता तुम्ही ज्या पद्धतीने रजिस्टर केले आहे त्यानुसार पुढील स्टेप्स फॉलो करा:
वेबसाईट द्वारे पेमेंट स्टेटस चेक करा
जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच वेबसाईट द्वारे अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस पाहू शकतात, त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वेबसाईट वरून पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी इथे क्लिक करा
नारी शक्तीदूत अॅप वरून पेमेंट स्टेटस पहा
ज्या महिलांनी सुरुवातीच्या काळात म्हणजेच नारी शक्तीदूत अॅप वर ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस पाहू शकतात, त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
नारी शक्तिदूत वरून पेमेंट स्टेटस पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अपात्र झालेल्या महिलांची यादी (डिसेंबर) पहा
- १,५०० हप्ता आला नाही – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करा
- वेबसाईट वरून माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करा
- कडबाकुट्टी अनुदान योजना – या शेतकऱ्यांना कडबाकुट्टीसाठी मिळणार 15,000 रुपये अनुदान आणि प्रति जनावर 5 किलो मुरघास
- गाई व म्हशी अनुदान योजना 2024 – शेतकऱ्यांना दुग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत मिळणार 13,400 गाई व म्हशी
- सोयाबीन आणि कापूस अनुदान यादी जाहीर: 10,000 रुपये मिळणार, अनुदान यादीत तुमचे नाव पाहा