नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस – तुमची नुकसान भरपाई वितरीत झाली का चेक करा ऑनलाईन

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस: राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जात त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या शेतकऱ्यांना आपली KYC पूर्ण करण्यासाठीचे आव्हान वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस चेक करा

बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही बरेच शेतकरी KYC करण्यापासून वंचित आहेत आणि परिणामी त्यांच्या अनुदानाचे वितरण देखील झालेल नाही आणि ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली आहे त्या शेतकऱ्यांना देखील बर्‍याच मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण झालेल नाही आणि काही जणांना वितरण झाले परंतु कोणत्या खात्यामध्ये होतं हे माहीत नाही किंवा पेमेंट न होण्यामागे कोणते कारण आहे ते माहीतच नाही. म्हणून आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून आपले अनुदानाचे स्टेटस कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस ऑनलाईन चेक करा

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करण्यासाठी राज्य शासनाने डिझास्टर मॅनेजमेंट नावाचे पोर्टल सुरु केलेलं आहे.

https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस

या पोर्टलवर ते आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विशिष्ट क्रमांक (VK) विचारला जातो. तुम्हाला तुमची KYC करताना जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला होता तो विशिष्ट क्रमांक इनपुट बॉक्स मध्ये इंटर करून सर्च बटन वर क्लिक करायचे आहे.

विशिष्ट क्रमांक एंटर करून सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या अनुदानाचे वितरण झालेल असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये किती तारखेला झालेल आहे, कोणती बँक आहे , कोणती शाखा अशा प्रकारची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल. त्याच्यामध्ये असलेली रक्कम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते.

नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस

आता एखाद्या विशिष्ट क्रमांकाची जर रक्कम वितरीत झाली नसेल तर त्या ठिकाणी पेमेंट स्टेटस मध्ये तुम्हाला त्याचं कारण दाखवला जाईल ज्यामध्ये तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या अधिकार्‍यांशी संपर्क करा अशा प्रकारे दाखवला जाईल.

नुकसान भरपाई न जमा होण्यामागे देखील बरीच करणे आहेत, जर शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल म्हणजेच जर आधार सीडींग केलेलं नसेल तर तर त्या शेतकऱ्याच्या अनुदानापासून वंचित राहावं लागेल. कारण आधार संलग्न बँक खात नसेल तर ते अनुदानाचे वितरण केले जात नाही.

Leave a Comment