मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा, यादीत तुमचे नाव तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी : राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासूनच अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० हून अधिक अर्जदारांनी ऑनलाईन नारी शक्तीदूत अ‍ॅप च्या माध्यमातून किंवा ऑफलाईन सेतू / अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अर्ज भरलेले आहेत. ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असतील त्यांच्या पात्रता याद्या यायला सुरुवात झालेली आहे. तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जिल्हा आणि वॉर्ड निहाय PDF फाईल कशी डाउनलोड करायची आणि त्यात आपले नाव कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी

31 August दिवशी या महिलांच्या खात्यावर येणार एवढे पैसे जमा होणार

राज्य सरकार च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने द्वारे राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज सुरु झालेत आणि हि अर्जप्रक्रिया आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी

सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूप सारे पात्रता निकष होते नंतर ते हटवले आणि योजनेचा अर्ज करण्याचा कालावधीही वाढवला. राज्य सरकारने जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे, त्यांनी अर्ज लवकर केला तरी आणि जरी अर्ज उशिरा केला तरी म्हणजे १ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत.

परंतु ज्या महिलांचा अर्ज ३१ जुलै पर्यंत पूर्ण झालेला किंवा पात्र झालेला होता अशा महिलांना रक्षाबंधनाच्या वेळेस थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात ३,००० एवढे पैसे जमा झालेले.

परंतु जर तुम्ही तुमचा अर्ज ऑगस्ट महिन्यात पूर्ण केलेला असेल आणि आता तुम्ही पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल, किंवा तुमचे नाव ३१ ऑगस्ट पर्यंत पात्र होईल तर तुम्हला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळून एकूण ४,५०० रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जिल्हानिहाय पात्रता यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत जवळपास २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता १५ ऑगस्ट च्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळेस जमा झालेला होता. आणि आता दुसरा हप्ता म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता ३१ ऑगस्ट रोजी जमा होणार असल्याची अधिकृत माहित राज्य सरकारने दिलेली आहे . त्या अनुषंगाने पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार याबद्दलची माहिती खाली दिले आहे, ते वाचून घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा.

तुमच्या जिल्ह्यानुसार आणि वॉर्ड नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download केल्यानंतर यादीत तुमचे नाव आहे कि नाही चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

गूगल च्या ड्राईव्ह PDF रीडर मधून डाउनलोड केलेली फाईल ओपन करा.
स्क्रीन च्या उजव्या बाजूला वरच्या कोपर्यात सर्च बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
तुमचे नाव, मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून सर्च करा.

नारी शक्तीदूत अ‍ॅप वरून आपल्या अर्जाचे स्टेटस पहा

नारी शक्तीदूत अ‍ॅप वर ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज पात्र झाला कि अपात्र झाला ते पाहू शकतात.

नारी शक्तिदूत वरून लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मागच्या काही दिवसापासून जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे. जर तुमच्या जिल्ह्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी आली असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून Download करा,आणि यादीत तुमचे नाव तपासा.

लाभार्थी यादी डाउनलोड करा

Leave a Comment