महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वय वर्ष वयोगटातील महिलांना राज्य सरकारने दर माह १५०० देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे. नारी शक्तीदूत अॅप वर ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज पात्र झाला कि अपात्र झाला ते पाहू शकतात.
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे, १ जुलै पासून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कधीही अर्ज केला तरी. परंतु ज्या महिलांनी अर्ज लवकर पूर्ण केलेला आहे आणि अशा महिलांचा अर्ज पूर्ण झालेला असेल आणि पात्र झालेला असेल अशा महिलांना १४ ऑगस्ट पासून लाभहस्तांतरण करण्यास सुरुवात होईल.
त्यामुळे तुम्ही अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्ही अजूनही ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करून ३१ ऑगस्ट पर्यंत तुमचे पहिल्या दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच ४,५०० रुपये मिळतील.
म्हणजे जर तुम्ही आता पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल तर तुम्हला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून एकूण ४,५०० रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.
नारी शक्तीदूत अॅप वरून अर्जाचे स्टेटस पहा
मागच्या काही दिवसापासून जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे. जर तुमच्या जिल्ह्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी आली असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून Download करा,आणि यादीत तुमचे नाव तपासा.
लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड
अजूनही काही जिल्ह्यांची पात्रता यादी आलेली नाही अशा लाभार्थ्यांनी आपला अर्ज पात्र झालेला आहे का नाही ते कसे तपासावे यांच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे.
सर्वात आधी तुम्हाला आपल्या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर वरून नारी शक्तिदूत हे अॅप डाउनलोड करून घ्यावे लागेल, जर अॅप डाउनलोड केलेले असेल तर गुगल प्ले स्टोर वरती जाऊन ते उपडेट करून घ्यावे.
आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून अॅप मध्ये लॉगिन करून घ्यावे. आता मागील काही दिवसापासून लॉगिन करताना काही अडचणी येत आहेत, जर तुम्हालाही अडचण येत असेल तर थोड्या वेळाने पुन्हा लॉगिन करण्याचा प्रयत्न करावा, लॉगिन होईल.
लॉगिन केल्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर होम स्क्रीन वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय दिसेल तिथून तुम्ही अर्ज करू शकता. आपल्या केलेल्या अर्जाचे स्टेटस चेक करायचे असेल तर खालील आडव्या बार मध्ये दिसणाऱ्या केलेले अर्ज या पर्यायावर टच करा.
आता तुम्हाला तुमच्या या मोबाईल नंबर वरून केलेल्या सर्व अर्जाची यादी दिसेल. तुम्हाला ज्या अर्जाचा स्टेटस पाहायच्या आहे त्याच्यावरती क्लिक करा.
Majhi ladki Bahin Yojana Status Check
Majhi Ladki Bahin Yojana Status पाहण्यासाठी नारी शक्तीदूत अॅप वर वरील बाजूला उजव्या कोपर्यात i बटन वरती क्लिक केल्यावर तुम्हाला आपला अर्ज कोणत्या स्थिती मध्ये आहे यांच्याविषयी संक्षिप्त माहिती मिळेल. इथे शासनाने अधिकृत माहिती दिलेली जेणेकरून तुमहाला तुमच्या अर्जाची स्तिथी पाहता येईल.
- इथे त्यांनी स्टेप बाय स्टेप माहित दिलेली आहे :
- जर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये असेल तर रिव्यू मध्ये जाईल,
- जर तुमचा फॉर्म रिव्यू मध्ये असेल तर तो अप्रूव्ह होईल,
- जर तुमचा फ्रॉम अप्रूव्ह नाही झाला तर तो रिजेक्ट होईल,
- आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही झाला तर डिसअप्रूव्ह होईल.
खाली दिलेल्या स्टेटस नुसार तुम्ही तुमच्या अर्जाची कार्यवाही करू शकता
Pending to Submitted / प्रलंबित ते सबमिट केलेले:
सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
Approved / मंजूर:
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमीटर कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
In Review / पुनरावलोकनातः
सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.
Rejected / नाकारलेः
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
Disapproved – Can Submit and Resubmit / अस्वीकृत – संपादित करून पुन्हा सबमिट करू शकताः
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.